खासदार उदयनराजे भोसले यांच्या पाठीशी भारतीय जनता पक्ष कायम आहे. त्यांच्या भावना योग्य ठिकाणी पोहोचविण्यात आल्या आहेत, असे सांगत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पदमुक्त करण्याचे सूचक संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- ‘राज्यपाल हटाव’च्या मुद्द्यावर संभाजीराजे-उदयनराजे आक्रमक, अजित पवार म्हणाले, “कोश्यारी खासगीत म्हणतात…”

राज्यातील महापुरुषांबाबत सातत्याने वादग्रस्त विधान करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पदमुक्त करण्यासाठी विरोधी पक्ष एकवटले आहेत. खासदार उदयनराजे भोसले यांनीही पुण्यात सोमवारी राज्यपालांविरोधात नाराजी व्यक्त करत राज्यपालांवर कारवाई करण्याची आग्रही मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर पुण्यात एका कार्यक्रमासाठी आलेले देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना पदमुक्त करण्याचे सूचक संकेत दिले.

हेही वाचा- गणपतीच का? ३३ कोटी देव अभ्यासक्रमात घ्या!

खासदार उदयनराजे भोसले यांच्या पाठीशी भारतीय जनता पक्ष कायम आहे. छत्रपती घराण्याचे वंशज कधीच हतबल होऊ शकत नाहीत. त्यांच्या भावना योग्य ठिकाणी पोहचल्या आहेत. राज्यपाल हे संविधानिक पद आहे. यात सरकार काही हस्तक्षेप करू शकत नाही. राज्यपालांना पदमुक्त करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deputy chief minister devendra fadnavis indication of bhagatsingh koshyari relieve for post governor pune print news dpj