पुणे : पुण्यातील सदाशिव पेठेतील हल्ल्यात तरुणीला वाचविणाऱ्या लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या दोघांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोबाईलवर कौतुक करून शुभेच्छा दिल्या. भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी संपर्क करून दिला.

https://images.loksattaimg.com/2023/06/devendra-fadanvis-call-leshpal.mp4

एकतर्फी प्रेमातून सदाशिव पेठेतील पेरू गेट पोलीस चौकाजवळ एका वीस वर्षीय तरुणीवर शंतनू जाधव याने कोयत्याने हल्ला केला होता. या हल्ल्यातून तरुणीला लेशपाल जवळचे आणि हर्षद पाटील या दोघांनी वाचविले होते. गेल्या मंगळवारी ही घटना घडली होती. तरुणीला वाचविणा-या या दोघा युवकांचे विविध संस्था संघटना कडून कौतुक होत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोघांशी दूरध्वनी द्वारे गुरुवारी संपर्क साधून त्यांचे कौतुक केले.