पुणे: राज्य शासनाने आपले गुरुजी या उपक्रमाअंतर्गत राज्यातील सर्व शाळांमध्ये शिक्षकांची छायाचित्रे वर्गात लावण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार किती शाळांमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी करून शिक्षकांची छायाचित्रे वर्गात लावण्यात आली याची माहिती शिक्षण विभागाने मागवली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिक्षण संचालनालयाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी दीपक पाटील यांनी या संदर्भातील परिपत्रक सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, जिल्हा परिषदांचे शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबईचे शिक्षण निरीक्षक यांना परिपत्रक पाठवले आहे. विधिमंडळात ही माहिती सादर करायची असल्याने तत्काळ माहिती सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा… महाबळेश्वरमध्ये ऑनलाइन हाॅटेल बुकिंग महागात; उच्चशिक्षित तरुणीची तीन लाखांची फसवणूक

आपले गुरुजी या उपक्रमात शिक्षकांची छायाचित्रे वर्गात लावण्यावरून वाद निर्माण झाला होता. शिक्षक संघटनांनी या निर्णयाला तीव्र विरोध केला होता. त्यामुळे किती शाळांतील वर्गांमध्ये शिक्षकांचे छायाचित्र लावण्यात आले या बाबत प्रश्न आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Did schools in the maharashtra put pictures of teachers in classrooms pune print news ccp 14 dvr