लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. सुरेश गोसावी यांची नियुक्ती करण्यात आली. राज्यपाल कार्यालयाकडून ही घोषणा करण्यात आली. त्यामुळे वर्षभराच्या खंडानंतर विद्यापीठाला पूर्णवेळ कुलगुरू लाभले आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठीच्या प्रक्रियेत शोध समितीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पर्यावरणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सुरेश गोसावी, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पराग काळकर, रसायनशास्त्र विभागाचे डॉ. अविनाश कुंभार, भौतिकशास्त्र विभागातील डॉ. संजय ढोले आणि कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागाचे डॉ.विजय फुलारी यांची शिफारस केली. त्यानंतर राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी या पाच जणांच्या २६ मे रोजी मुलाखती घेतल्या. त्यानंतर कुलगुरूपदी कोणाची निवड होणार याची उत्सुकता ताणली गेली होती.

आणखी वाचा-पुणे: मेट्रोचे साहित्य चोरणाऱ्या तीन महिलांसह पाच जणांना अटक

डॉ. सुरेश गोसावी हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाचे प्रमुख आहेत. प्लाझ्मा पॉलिमरायझेशन वापरून लिथोग्राफी आणि नमुना हस्तांतरण, ड्राय इलेक्ट्रॉन बीम संश्लेषण, मल्टी-इलेक्ट्रॉन बीम लिथोग्राफी सिस्टम डिझाइन, नॅनोमटेरियल्स, नॅनोटेक्नॉलॉजी मायक्रो फ्लुइड क्स, सॉफ्ट लिथोग्राफी हे त्यांच्या संशोधनाचे विषय आहेत. त्यांच्या रुपाने विद्यापीठातील प्राध्यापकाची कुलगुरूपदी निवड झाली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr suresh gosavi has been appointed as the vice chancellor of savitribai phule pune university pune print news ccp14 mrj