पुण्याच्या चाकणमध्ये जेवणात मीठ कमी झाले म्हणून ढाबा चालकाने आचाऱ्याचा खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली असून आरोपी सख्ख्या भावांना पिंपरी- चिंचवड च्या गुन्हे शाखा युनिट तीन ने बेड्या ठोकल्या आहेत. प्रसेनजीत गोराई (वय ३०) रा.पश्चिम बंगाल अस खून झालेल्या आचाऱ्याचे नाव आहे. ओंकार अण्णा केंद्रे (वय- २१) आणि कैलास अण्णा केंद्रे (वय १९) मूळ राहणार दिग्रस जि. नांदेड अशी अटक करण्यात आलेल्या ढाबा चालकांची नाव आहेत. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- वसंत मोरे यांची नाराजी आता तरी दूर होणार का? पुणे दौऱ्यादरम्यान अमित ठाकरेंकडून वसंत मोरेंना भेटीचे निमंत्रण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ओंकार आणि कैलास हे दोघे सख्खे भाऊ आहेत. ते मूळ चे नांदेड जिल्ह्यातील दिग्रस येथील असून त्यांनी चाकण – शिक्रापूर रोडवर ढाबा चालवण्यासाठी घेतला होता. मयत आचारी प्रसेनजीत हा त्यांच्याकडे नुकताच कामाला लागला होता. त्याच्याकडून जेवणात मीठ कमी जास्त व्हायचं. यावरून ढाबा चालक ओंकार, कैलास यांचं प्रसेनजीत सोबत वाद होत असत. ऑक्टोबर महिन्यात जेवणात मीठ कमी का? पडलं यावरून त्यांच्यात टोकाचा वाद झाला. आचारी प्रसेनजीत च्या डोळ्यात चटणी टाकून लोखंडी रॉडने बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत आचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. एक दिवस मृतदेह ढाब्याच्या आतील खोलीत ठेवण्यात आला, इतर कामगारांना दमदाटी करून त्यांना शांत राहण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी तो मृतदेह ओढ्यात फेकून दिला. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा- दोन लाख ८१ हजार मतदारांची नावे वगळली; पुणे जिल्ह्यातील २१ मतदार संघांतील मतदारांची संख्या ७८ लाख ७६ हजार

काही दिवसांनी म्हणजे ६ नोव्हेंबर रोजी आचाऱ्याचा मृतदेह आढळला. त्याची चौकशी करण्याऐवजी चाकण पोलिसांनी शवविच्छेदन अहवालाची वाट पाहात अकस्मात मृत्यू ची नोंद केली. अद्याप ही शवविच्छेदन अहवाल आला नसल्याचं पोलिस निरीक्षक वैभव शिनगारे यांनी सांगितलं आहे. मात्र, त्या घटनेचा आम्ही तपास करत होतो अस ही म्हटलं. याच दरम्यान, गुन्हे शाखा युनिट तीन चे पोलिस अधिकारी शैलेश गायकवाड यांच्या पथकाला माहिती मिळाली की, तो अकस्मात मृत्यू नसून खून आहे. ओंकार ढाबा चालकाने आचाऱ्याचा खुन केल्याच त्यांना खबऱ्याने सांगितलं. गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक गिरीश चामले हे इतर एका साथीदाराला घेऊन ग्राहकाच वेषांतर करून त्या ढाब्यावर गेले, तिथं जेवण केलं. ढाबा चालक कैलास आणि ओंकार चा विश्वास संपादन केला. मग, दोन्ही आरोपींसोबत फोटो काढून तो खबऱ्याला दाखवला आणि त्यांनीच खून केला असल्याच पुढील तपासात निष्पन्न झाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Due to lack of salt in the food the dhaba owner killed the chef in chakan pune kjp dpj
First published on: 09-12-2022 at 14:10 IST