पिंपरी- चिंचवड:पिंपरी- चिंचवडमध्ये दैव बलवत्तर असल्याने तरुणाचा जीव थोडक्यात बचावला आहे. ही घटना शनिवारी दुपारी सव्वा एकच्या सुमारास वल्लभ नगर परिसरात घडली आहे. या अपघाताची भीषणता सीसीटीव्ही बघितल्यानंतर समोर येते. या घटनेनंतर गॅरेज समोरील दुचाकीचं मोठं नुकसान झालं आहे. याप्रकरणी वल्लभनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

दुपारी सव्वा एकच्या सुमारास बांधकामाची क्रशन घेऊन जात असताना भरलेला डंपर एका बाजूला कलंडल्याने अपघात झाला आहे. सुदैवाने अपघातात दुचाकी वरील तरुण थोडक्यात बचावला आहे.

वल्लभ नगर परिसरात ही घटना घडली आहे. क्रशनने भरलेला डंपर बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी जात होता. रस्त्यात बंदीस्त ड्रेनेज होता. चालक आजूबाजूला वाहन बघून डंपर पुढे- पुढे घेत होता. तेव्हाच तरुण डंपर चालकाला बोलत होता.

तो ही वाहन बघत होता. ड्रेनेजवरून डंपर पुढे जाताच अचानक खाली चाक फसल आणि उजव्या बाजूला डंपर कलंडला. डंपरमधील क्रशन एका बाजूला खाली पडल. सुदैवाने यात तरुण अडकला नाही. तरुणाने प्रसंगवधान राखत बाजूला झाला. डंपरमधील चालक कसाबसा बाहेर पडला. या घटनेनंतर वल्लभनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याच काम सुरू आहे.

” मोटर अपघात कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येत आहे. याबाबत गुन्हा दाखल झाल्यास चौकशी करणार आहोत.”- वनिता धुमाळ- पोलीस निरीक्षक