लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: पावसाळ्यामुळे खोल समुद्रातील मासेमारी बंद झाली आहे. त्यामुळे मासळीला मागणी असूनही आवक कमी झाल्याने मासळी महाग झाली आहे. त्यामुळे मासेप्रेमींच्या खिशाला फटका बसत आहे.

सध्या सुरमई, पापलेट, ओले बोबिंलसह सर्व प्रकारच्या मासळीच्या दरात २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. चिकन, मटण, अंड्यांचे दर स्थिर आहे. गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी खोल समुद्रातील मासळी ७ ते ८ टन, खाडीतील मासळी २०० ते ३०० किलो, नदीतील मासळी ४०० ते ५०० किलो, तसेच आंध्र प्रदेशातून रहू, कतला, सिलनची एकूण मिळून १५ ते २० टन आवक झाली, अशी माहिती मासळीविक्रेते ठाकूर परदेशी, चिकनविक्रेते रुपेश परदेशी आणि मटणविक्रेते प्रभाकर कांबळे यांनी दिली.