लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील चिंचवड, भोसरी, तळेगाव आणि महाळुंगे येथे केलेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये चार पिस्तूल आणि सहा काडतुसे जप्त केली आहेत. या कारवायांमध्ये तिघांना अटक केली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.

गुन्हे शाखा युनिट दोनने चिंचवड येथे कारवाई करत सलमान साबीर शेख (वय २५, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) याला अटक केली. त्याच्याकडून ५० हजार रुपये किमतीचे पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त केली आहेत. ही कारवाई ५ मार्च रोजी करण्यात आली. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी भोसरी पोलिसांनी तापकीर नगर मोशी येथे गुरुवारी दुपारी कारवाई करत आकाश दिनकर गायकवाड (वय २४, रा. मोशी) याला अटक केली. त्याच्याकडून २५ हजार रुपये किमतीचे पिस्तूल आणि एक काडतूस जप्त केले आहे. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तळेगाव दाभाडे पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी सोमाटणे फाटा ते ठाकरवस्ती रोडवर कारवाई करत एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १६ हजार रुपये किमतीचा देशी कट्टा आणि दोन काडतुसे जप्त केली आहेत. याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हे शाखा युनिट तीनने खेड तालुक्यातील निघोजे येथे गुरुवारी दुपारी कारवाई केली. या कारवाई मध्ये आकाश बाळू थोरात (वय २६, रा. चाकण) याला बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Four pistols seized from different places in pimpri on the same day pune print news ggy 03 mrj