पुणे : येरवडा भागात दहशत माजविणाऱ्या गुंडाविरोधात पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्याचे आदेश दिले. गुंडांला वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोहसीन अन्वर खान उर्फ शेख (वय ३२, रा. जिजामातानगर, नवी खडकी, येरवडा) असे कारवाई केलेल्या गुंडाचे नाव आहे. मोहसीन याने साथीदारांच्या मदतीने येरवडा आणि विमानतळ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गंभीर गुन्हे केले होते. त्याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, विनयभंग, जबरी चोरी, बेकायदा शस्त्र बाळगणे, असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या दहशतीमुळे नागरिक तक्रार करत नव्हते.

हेही वाचा – पिंपरीत वर्षभर राबविणार ई-कचरा संकलन अभियान

हेही वाचा – पुणे जिल्हा परिषदेचे २०४ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक; प्रशासक असल्याने संस्थात्मक कामांवर भर

मोहसीनविरुद्ध झोपडपड्डी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्याचा प्रस्ताव येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे, गुन्हे प्रतिबंधक शाखेच्या पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे यांनी तयार केला. संबंधित प्रस्ताव पोलीस आयुक्तांनी मंजूर केला. त्यानंतर त्याला वर्षभरासाठी नाशिक रस्ता कारागृहात ठेवण्याचे आदेश देण्यात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Goon lodged in yerawada jail for a year under mpda act pune print news rbk 25 ssb