पुणे : “पुण्यातील भाजपाचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांचे कुटुंबीय अद्याप दुःखातून सावरलेले नाही. त्यामुळे पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीबाबत तुम्ही काहीही अफवा पसरवू नका. तूर्तास मीही कोणती चर्चा घडवणार नाही”, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – ‘सीयुईटी-पदवीपूर्व’च्या अर्जांसाठी ९ ते ११ एप्रिलदरम्यान पुन्हा संधी

हेही वाचा – पुणे – सोलापूर रस्त्यावर यात्रेहून परतणाऱ्या बसचा अपघात; ११ प्रवासी गंभीर जखमी

पुण्याच्या मावळमध्ये बावनकुळे यांच्या हस्ते शिरे-शेटेवाडीतील पुनर्वसन भूखंडाचे लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. गिरीश बापटांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी भाजपाचा उमेदवार कोण असेल? अशी चर्चा पुणे लोकसभेत रंगलेली आहे. त्या चर्चांना बावनकुळे यांनी तूर्तास पूर्णविराम दिला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I will not discuss the pune lok sabha byelection for now neither should you says chandrasekhar bawankule kjp 91 ssb