पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ तीनच्या हद्दीतील चाकण, म्हाळुंगे, भोसरी एमआयडीसी या औद्योगिक क्षेत्रातून गंभीर गुन्हे दाखल असलेल्या २८ गुन्हेगारांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. एक ते दोन वर्षांसाठी पाेलीस उपायुक्त डाॅ. शिवाजी पवार यांनी ही कारवाई केली आहे. यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पाेलिसांच्या वतीने विविध उपाययाेजना करण्यात येत आहेत. त्यानुसार गंभीर गुन्हे दाखल असलेले मार्च महिन्यात सात, तर एप्रिलमध्ये २१ अशा २८ सराइतांना एक ते दाेन वर्षांसाठी जिल्ह्यातून तडीपार केले आहे. दराेडा, बलात्कार, जबरी चाेरी, दहशत माजविणे, खंडणी, अपहरण यासह संघटित गुन्हेगारी करणारे हे गुन्हेगार आहेत. तसेच शंभरपेक्षा जास्त गुन्हेगारांच्या हालचालींवर पाेलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

हनुमंत नामदेव भाेसले (वय ३५, रा. चऱ्हाेली), बुद्धभूषण ऊर्फ बुध्या माणिक पालके (वय २३, रा. चिखली), सुमीत ऊर्फ सुम्या विलास क्षीरसागर (वय २०, रा. चिखली), निर्जला गणेश कुंभार (वय २२, रा. डुडुळगाव), नितीन सखाराम तांबे (वय ४१, रा. खेड), अभिजित ऊर्फ धीरज विलास निटुरे (वय २८, रा. लांडेवाडी, भाेसरी), अतुल बाळासाहेब चाैधरी (वय २८), स्वप्निल बाळासाहेब चाैधरी (वय २५, दाेघेही रा. खालुंब्रे), आकाश बाळासाहेब शेळके (वय २८, रा. काेरेगाव), नारायण सुनील घावटे (वय २४), गणेश हिरामण लिंबाेरे (वय २४, दाेघेही रा. शेलू), सुपडा काशिराम सूर्यवंशी (वय ५५, रा. दिघी), आदर्श ऊर्फ डपक्या गाैतम खंदारे (वय २०, रा. जाधववाडी), पंढरीनाथ सुभाष सूर्यवंशी ऊर्फ पाटील (वय ४७, रा. दिघी), अजय ऊर्फ विजय दगडू पवार (वय २०, रा. चाकण), प्रतीक बंडू शेलार (वय २४, रा. चिखली), सुशांत दीपक भाेसले (वय २२), धनंजय आकाश दुनगाव (वय २९, दाेघेही रा. दिघी), आकाश संजय तिकाेणे (वय ३०, रा. नाणेकरवाडी), तुषार ऊर्फ गाेल्या रामराव राठाेड (वय २७, रा. चऱ्हाेली फाटा), ओंकार ऊर्फ माेन्या नवनाथ पऱ्हाड (वय २०, रा. भाेसे) अशी तडीपार केलेल्या सराईत आराेपींची नावे आहेत.

शहरात शांतता राहावी, यासाठी दाेन महिन्यांत २८ सराइतांना पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. तडीपार केलेले गुन्हेगार जिल्ह्यात दिसून आल्यास तत्काळ पाेलीस नियंत्रण कक्षाच्या ११२ क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त डाॅ. शिवाजी पवार यांनी केले.