पिंपरी : शहरात गणपती विसर्जनाची धामधूम सुरू असताना वाकड परिसरात एका अज्ञाताने हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात गणपती विसर्जन मिरवणूक सुरू आहे. पिंपरी आणि चिंचवड परिसरातील गणरायाला निरोप दिला जात आहे. त्यातच वाकड परिसरात काही वेळापूर्वी अज्ञाताने हवेत गोळीबार केल्याची घटना घडली. गोळीबार झाल्याबाबत एका व्यक्तीने पोलीस नियंत्रण कक्षाला फोनद्वारे ही माहिती दिली.

हेही वाचा : पिंपरी : मूर्तीदान उपक्रमाला प्रतिसाद; घरगुती गणपती विसर्जनासाठी घाटावर गर्दी

वाकडमधील विकास आराखड्यातील रस्त्यावर पांढर्‍या मोटारीतून येऊन एका व्यक्तीने हवेत गोळीबार केल्याबाबत माहिती मिळाली. वाकड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अधिक माहिती घेऊन कारवाई करीत असल्याचे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी सांगितले.