पिंपरी : शहरातील भोसरी परिसरात जलजन्य आजार असलेल्या काॅलराचे दोन रूग्ण आढळले आहेत. दोघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर, तिघांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. भोसरी येथील धावडे वस्तीमध्ये महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या जलवाहिनीमधून एका नागरिकाने नळजोड घेतले होते. मात्र, नळजोड घेताना खबरदारी न घेतल्यामुळे वाहिनीला गळती झाली. यातून दुषित पाणी पुरवठा होऊन संबंधित दोन रुग्णांना काॅलराची लागण झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. या दोन्ही रूग्णांवर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर तिघांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

हेही वाचा : शिवसेना शिंदे गटाला केवळ एकच मंत्री पद; श्रीरंग बारणे यांनी जाहीर केली नाराजी

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pimpri chinchwad two cholera patients found at bhosari area pune print news ggy 03 css
First published on: 12-06-2024 at 12:35 IST