पुणे : देशभरात लसणाचा तुटवडा जाणवत असल्याने लसणाला उच्चांकी दर मिळाले आहेत. लसणाचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी अफगाणिस्तानातील लसूण आयात करण्यात आला आहे. अफगाणिस्तानातील लसूण मुंबई, दिल्ली, तसेच दक्षिण भारतातील बाजारपेठेत विक्रीस पाठविला जात आहे. अफगाणिस्तानातील लसूण आयात केल्याने दर नियंत्रित झाले आहेत. अन्यथा, किरकोळ बाजारातील लसणाच्या दरात मोठी वाढ होऊन प्रति किलोचे दर ५०० रुपयांच्या पुढे गेले असते, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या हंगामात लसणाच्या उत्पादनात घट झाल्याने बाजारात लसणाचा तुटवडा जाणवत आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी प्रमाणावर होत असल्याने लसणाला उच्चांकी दर मिळाले आहेत. किरकोळ बाजारात एक किलो लसणाचे दर ४०० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. नवीन आवक सुरू होईपर्यंत पुढील दोन महिने दर तेजीत राहणार आहेत. लसणाचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी अफगाणिस्तानातील लसूण मागविण्यात आला आहे. मुंबई, दिल्ली, दक्षिण भारतातील बाजारपेठेत अफगाणिस्तानातील लसूण विक्रीस पाठविला जात आहे. अफगाणिस्तानातील लसूण आयात केल्याने दर नियंत्रित झाले आहेत, अशी माहिती मार्केट यार्डातील लसूण व्यापारी समीर रायकर यांनी दिली.

हेही वाचा : पुणे : तडीपार गुंडाकडून पिस्तुलासह अमली पदार्थ जप्त, कात्रज भागात कारवाई

लसणाची सर्वाधिक लागवड गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाबात केली जाते. गेले दोन वर्ष लसणाला कमी दर मिळाल्याने तेथील शेतकऱ्यांनी लसणाची लागवड कमी केली. त्यांनी लसणाऐवजी अन्य पिकांची लागवड करण्यास प्राधान्य दिले. त्यामुळे लसणाची लागवड कमी झाली होती. लसणाचा हंगाम जानेवारी महिन्यात सुरू होतो. गेल्या वर्षी हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांकडे लसणाचा फारसा साठा नव्हता. त्यामुळे यंदा लसणाचे तेजीतील दर टिकून होते. लसणाचा हंगाम सुरू होण्यास दोन महिन्यांचा कालावधी आहे. मागणीच्या तुलनेत आवकही कमी प्रमाणावर होत असल्याने लसणाला उच्चांकी दर मिळाले आहेत, असे त्यांनी सांगितले.

लसणाचा तुटवडा का?

गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब या राज्यांत लसणाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. गेले दोन वर्ष लसणाला दर मिळाले नव्हते. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांनी लागवड क्षेत्र कमी करून अन्य पिकांची लागवड करण्यास प्राधान्य दिले. महाराष्ट्रासह देशभरातील सर्व राज्यांतील बाजारपेठेत लसणाचा तुटवडा जाणवत आहे.

हेही वाचा : चंद्रकांतदादांनी विरोध करूनही त्यांच्याच मतदारसंघात दिलजीत दोसांझचा कार्यक्रम झाला अन् …

फेब्रुवारीपर्यंत दर चढेच…

मार्केट यार्डातील फळभाजी बाजारात परराज्यातून लसणाच्या पाच ते सात गाड्यांची आवक होत आहे. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नवीन लसणाचा हंगाम सुरू होईल. फेब्रुवारीत आवक वाढल्यानंतर लसणाचे दर कमी होतील. चांगले दर मिळाल्याने उतरेकडील शेतकऱ्यांनी यंदा लसणाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली आहे, असे रायकर यांनी नमूद केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune afghanistan garlic imported due to higher prices and shortage of garlic pune print news rbk 25 css