लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे: तब्बल सहा फूट उंचीच्या संरक्षक भिंतीवरून उडी मारून बंगल्यात प्रवेश केलेल्या बिबट्याने कुत्र्याला उचलून नेल्याची घटना नुकतीच मंचर (ता. आंबेगाव) येथे घडली आहे. सीसीटीव्ही चित्रीकरणातून ही बाब उघड झाल्यामुळे मंचर शहर व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मंचर शहराच्या पूर्वेला एक किलोमीटर अंतरावर एस. कॉर्नर येथे भरवस्तीत शेतकरी श्रीराम वामनराव गांजाळे यांच्या बंगल्याला तटबंदी संरक्षक भिंत असून लोखंडी प्रवेशद्वार आहे. बिबट्याचा या भागात वावर होता, पण संरक्षण भिंती असल्यामुळे बिबट्या येणार नाही असा समज गांजाळे कुटुंबाचा होता. श्रीराम गांजाळे यांचा काळू नावाचा लाडका कुत्रा दिसत नव्हता. कदाचित कुत्रा बाहेर गेला असेल तो परत माघारी येईल म्हणून कुटुंबीय वाट पाहत होते. पाच ते सहा दिवस होऊनही काळू घरी आला नाही. त्यामुळे नुकतेच गांजाळे कुटुंबीयांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असता त्यांना धक्काच बसला. चक्क बिबट्या कुत्र्याला घेऊन जात असताना दिसला.

https://www.loksatta.com/wp-content/uploads/2023/05/leopard-and-dog.mp4
व्हिडिओ सौजन्य- लोकसत्ता टीम

हेही वाचा… पुणे: जिल्ह्यात १२ लाख जमीन आरोग्यपत्रिकांचे वाटप

या पूर्वीही शरद सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष सूर्यकांत थोरात यांच्या चांडोली बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील बंगल्याच्या सहा फूट उंचीच्या संरक्षक भिंतीवरून उडी मारून कुत्र्याचा फडशा पडल्याची घटना घडली आहे. या पार्श्वभूमीवर या परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune city leopard entered the bungalow and carried away the dog cctv footage revealed pune print news vvk 10 dvr