पुणे : शाळेत जाण्यासाठी निघालेल्या चौथीतील मुलीवर २७ वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना पुण्यातील वाघोली परिसरात घडली आहे.या प्रकरणातील आरोपीला वाघोली पोलिसांनी अटक केली असून या घटनेमुळे वाघोली परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इयत्ता चौथीमध्ये शिक्षण घेणारी पीडित मुलगी आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घरातून शाळेत जाण्यास निघाली. शाळेत जाण्याच्या रस्त्यावर एक पिठाची गिरण होती,त्या पिठाच्या गिरणीत कामाला असलेल्या २७ वर्षीय आरोपीने तिला अडवले, तुला खाऊ देतो असे आमिष दाखवून आरोपीने पीडित मुलीला पिठाच्या गिरणीत घेऊन गेला आणि त्या ठिकाणी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

काही वेळाने गिरणीपासून काही अंतरावर पीडित मुलगी रडत होती.ते रस्त्यावरून जाणार्‍या येणार्‍या नागरिकांनी पाहिले.त्यावेळी काही नागरिकांनी तिच्याकडे मुलीकडे विचारपूस केल्यावर तिने घडलेला प्रकार सांगितला.त्यानंतर नागरिकांनी तात्काळ पोलिसांना याबाबत माहीती दिली.या घटनेची माहीती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल होऊन आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला.या आरोपीकडे वाघोली पोलीस अधिक तपास करीत आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune fourth standard girl raped by 27 year old accused svk 88 css