पुणे : वैमनस्यातून धनकवडी परिसरात तरुणावर कोयत्याने वार करण्यात आल्याची घटना घडली. तरुणाच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. करण रामचंद्र शिवतरे (रा. तापकीर चौक, शेलार चाळीजवळ, धनकवडी) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. शिवतरे याच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी प्रेम चव्हाण, नान्या सावंत, संदेश नायर यांच्यासह तीन ते चार साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत करणचे वडील रामचंद्र शिवतरे यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करण शिवतरे मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास धनकवडीत मित्रांबरोबर गप्पा मारत थांबला होता. त्या वेळी आरोपी चव्हाण, सावंत, नायर यांनी करणला शिवीगाळ करुन मारहाण केली. त्याच्यावर कोयत्याने वार केले. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात करण गंभीर जखमी झाला. आरोपी तेथून पसार झाले. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक सुरेखा चव्हाण तपास करत आहेत.

हेही वाचा : पुणे : खर्च महापालिकेचा, नियंत्रण पोलिसांना का हवे? नक्की काय आहे प्रकार

बिबवेवाडीत तरुणावर गोळीबार, तसेच वाहन तोडफोडीची घटना नुकतीच घडली. त्यानंतर वैमनसन्यातून धनकवडी भागात तरुणावर कोयत्याने वार करण्यात आल्याची घटना घडल्याने धनकवडी, बिबवेवाडी भागात दहशतीचे वातावरण आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune koyta attack on youth at dhankawadi area pune print news rbk 25 css