पुणे : अल्पवयीन मुलीला मोबाइलवर अश्लील चित्रफीत दाखवून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या एकास भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. ऋत्विक गणेश दुगड (वय २३, रा. विघ्नहर्तानगर, कात्रज-कोंढवा रस्ता) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत मुलीच्या आईने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अल्पवयीन मुलगी तिच्या आजीच्या घरी राहत होती.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
दुगडने अल्पवयीन मुलीला मोबाइलवर अश्लील चित्रफीत दाखवून तिच्यावर अत्याचार केले. दुगडच्या अत्याचारामुळे अल्पवयीन मुलगी घाबरली. तिला मानसिक विकाराने ग्रासले. अखेर मुलीने या प्रकाराची माहिती आईला दिली. मुलीच्या आईने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर दुगडला अटक करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक तावडे तपास करत आहेत.
First published on: 11-10-2023 at 15:31 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune one arrested for sexually assaulting a minor girl by showing her obscene tape pune print news rbk 25 css