पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघात सोमवारी सकाळी साडेसात वाजता प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली. तत्पूर्वी झालेल्या मतदान यंत्र प्रात्यक्षिकामध्ये (माॅक पोल) ६० मतदान यंत्रे बदलण्यात आली. यामध्ये २४ बॅलेट युनीट, १० कंट्रोल युनीट आणि २६ व्हीव्हीपॅट यांचा समावेश आहे.  तसेच प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी देखील विविध मतदान केंद्रांवर मतदान यंत्रे बंद पडल्याने मतदान यंत्रणा बंद पडल्याच्या घटना घडल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोमवारी सकाळी साडेसात वाजता प्रत्यक्ष मतदान सुरू होण्यापूर्वी निवडणूक रिंगणात असलेले उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मतदान यंत्र प्रात्यक्षिक प्रत्येक मतदान केंद्रांवर घेण्यात आले. यावेळी २४ बॅलेट युनीट (०.३२ टक्के) १० कंट्रोल युनीट (०.४०चक्के) आणि २६ व्हीव्हीपॅट  (१.०४ टक्के) असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे ही मतदान यंत्रे तातडीने बदलण्यात आली.

हेही वाचा – …अन पार्थ पवारांचा पराभव आम्ही विसरू शकत नाहीत – संजोग वाघेरे

मतदानाला सुरुवात झाल्यानंतर शिरूर विधानसभा मतदारसंघातील काळभोर, राजगुरूनगर यांसह विविध मतदान केंद्रांवर मतदान सुरू असताना  बीयू, १८ (०.२४ टक्के) कंट्रोल युनीट ६ (०.२४ टक्के) आणि १८ (०.७२) व्हीव्हीपॅट यंत्रे बंद पडली होती. त्यामुळे काही काळ मतदान प्रक्रिया थांबली होती. उन्हाचा तडाखा दुपारनंतर पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केल्यान शिरूर लोकसभा मतदारसंघात सकाळपासून मतदान केंद्रांवर गर्दी होती. मात्र मतदान केंद्रांवर मतदान यंत्रे बंद पडल्याने अर्धा तास, एक तास मतदारांना खोळंबून थांबावे लागले. 

हेही वाचा – सीबीएसईच्या दहावी, बारावीच्या निकालात वाढ, राज्याचा निकाल किती?

त्यानंतर संबंधित सदोष मतदान यंत्रे बदलून नवीन यंत्रे बसवून मतदान प्रक्रिया पूर्ववत करण्यात आली, अशी माहिती शिरूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांनी दिली. 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In shirur the voting machines were shut down before the polling what happened pune print news psg 17 ssb