…यातून स्पष्ट होतंय की सध्या आगळं वेगळं दबावतंत्र वापरलं जातंय – सचिन आहिर

संजय राऊतांना ईडी कडून नोटीस पाठवण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर केली आहे टीका

Sachin aahir
सचिन आहिर यांनी पत्रकारपरिषदेतून संवाद साधला

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राजकीय वातावरण तापले असताना आता सक्तवसुली संचलनालयाने(ईडी) शिवसेना खासदार संजय राऊत यांना समन्स बजावला आहे. त्यांना उद्या (मंगळवार) चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगण्यात आल्याचे समोर आले असून, गोरेगाव पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी हे समन्स बजावण्यात आले आहे. यावरून शिवसेना उपनेते सचिन आहिर यांनी आज माध्यमांशी बोलताना टीका केली आहे.

या पार्श्वभूमीवर पत्रकारपरिषदेत बोलताना सचिन आहिर म्हणाले, “हे अत्यंत दुर्दैवी आहे. यातून स्पष्ट होतंय की सध्या आगळं वेगळं दबावतंत्र वापरलं जातंय. ही चौकशी नंतर ही करता आली असती. पण आज संजय राऊतांनी जी आघाडी घेतली आहे, त्यापासून त्यांना रोखण्याचा हा प्रयत्न होतोय का? पण, तरीही निर्भीडपणे ते जनतेसमोर वस्तुस्थिती मांडणार.”

पाहा व्हिडीओ –

तसेच, “सध्या आमदारांच्या निलंबनाची प्रक्रिया ही विधानसभा उपाध्यक्षांसमोर आहे. त्यांनी अद्याप कोणता निर्णय घेतलेलाच नाही, तोपर्यंत यांनी याचिका न्यायालयात दाखल केली. मात्र माझ्या ज्ञानानुसार सर्वोच्च न्यायालय विधानसभेचा निर्णय येईपर्यंत यात हस्तक्षेप करणार नाही. घटनेनुसार जर हे झाले असते तर ते चाललं असतं. शिवाय महाविकास आघाडीचा पाठिंबा काढून घेतला हे न्यायालयात सांगतले, म्हणजे न्यायालय शासनाला आदेश देतील, असं कधी होत नाही. घटनेनुसार विधीमंडळ, मग राज्यपालांकडे प्रकरण जातं. त्यामुळं तूर्तास तरी न्यायालयात जाऊन सांगणं हे घटनेत बसत नाही. मात्र शेवटी न्यायालय काय निर्णय देतं हे पाहावं लागेल.” असंही यावेळी आहिर यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: It is clear from this that a different pressure system is being used at present sachin ahir kjp 91 msr

Next Story
खडकीतील दारुगोळा कारखान्यात चंदन चोरी ; १३ झाडे कापून चोरटे पसार
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी