पुणे : वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वार करुन त्याचा खून करण्यात आल्याची घटना नाना पेठेतील नवा वाडा परिसरात घडली. या प्रकरणी दोघांच्या विरोधात समर्थ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अक्षय वल्लाळ (रा. नवा वाडा, नाना पेठ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरण महेश नारायण बुरा, किशोर अशोक शिंदे (दोघेही रा. नवा वाडा, नाना पेठ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अतुल गंगाधर गायकवाड (वय ३३, रा. नाना वाडा, नाना पेठ) यांनी समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अक्षय आणि आरोपी महेश, किशोर नाना पेठेतील नवा वाडा परिसरा राहायला आहेत. आरोपींशी अक्षयची काही दिवसांपूर्वी भांडणे झाली होती. अक्षय नवा वाडा परिसरातील एका इस्त्रीच्या दुकानाजवळ थांबला होता. त्या वेळी आरोपींनी त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले तसेच त्याच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारला. त्या वेळी इस्त्री दुकानाचे चालक अतुल गायकवाड यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. गंभीर जखमी झालेल्या अक्षयचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पसार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.