पुणे : कंपनीत झालेल्या वादातून सहकाऱ्याचा खून करणाऱ्या तरुणाला जिल्हा सत्र न्यायाधीश बी. पी. क्षीरसागर यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्यायालयाने आरोपीला २० हजार रुपयांचा दंड ठोठावला असून, दंडाची रक्कम खून खून झालेल्या तरुणाच्या आईला देण्याचे आदेश दिले आहेत. दंडाची रक्कम न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारवास भोगावा, अशी तरतूद न्यायालयाने निकालपत्रात केली आहे.

सूरज सुनील फाळके (वय २७, रा. लक्ष्मीनगर, कोंढवा बुद्रुक) असे जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्याचे नाव आहे. अमोल खडके असे खून झालेल्याचे नाव आहे. आरोपी सूरज आणि अमोल हे कोंढव्यातील एका खासगी कंपनीत कामाला होते. दोघांमध्ये कंपनीत वाद झाला होता. २६ ऑक्टोबर २०२१ रोजी सूरजने कंपनीत झाेपलेल्या अमोल याच्या डोक्यात लोखंडी गज मारला. झोपेत असलेला अमोल गंभीर जखमी झाला. त्याला कंपनीतील कर्मचाऱ्यांनी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करुन आरोपी सूरजला अटक करण्यात आली. या गुन्ह्याचा तत्कालिन सहायक पोलीस निरीक्षक संदीप मधाळे यांनी करुन आरोपी सूरजविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले.

या खटल्यात सरकार पक्षाकडून सहायक सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी बाजू मांडली. साक्ष, तसेच पुरावे ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपी सूरजला जन्मठेप आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम सूरजच्या आईला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. दंडाची रक्कम न भरल्यास एक महिने अतिरिक्त कारवास भोगावाा लागेल, असे न्यायालायने आदेशात म्हटले आहे. न्यायालयीन कामकाजासाठी सहायक फौजदार महेश जगताप, पोलीस कर्मचारी माने यांनी सहाय केले. परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे यांनी सहायक फौजदार जगताप आणि माने यांना दहा हजार रुपयांचे बक्षीस मंजूर केले.