पुणे : येरवड्यातील खुल्या काारागृहातून जन्मठेपेची शिक्षा सुनावलेला कैदी पसार झाल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी पसार झालेल्या कैद्याविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल मेघदास पटोनिया (वय ३५) असे पसार झालेल्या कैद्याचे नाव आहे. पटोनिया मूळचा ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा परिसरात असलेल्या म्हारल गावातील आहे. त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात त्याला जन्मठेपेची शिक्षा, तसेच १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> पुणे : नगर रस्त्यावर पीएमपी बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

खुले कारागृह स्वतंत्र शासकीय संस्था आहे. चांगली वर्तणूक असलेल्या कैद्यांची रवानगी खुल्या कारागृहात केली जाते. पटोनिया याची कारागृहातील वर्तणूक चांगली असल्याने त्याची रवानगी खुल्या कारागृाहत करण्यात आली होती. बुधवारी दुपारी नेहमीप्रमाणे खुल्या कारागृहातील कैद्यांची हजेरी घेण्यात आली. तेव्हा पटोनिया आढळून आला नाही. त्यानंतर त्याचा शोध घेण्यात आला. तो पसार झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. खुल्या कारागृहातील कर्मचारी राजेंद्र मरळे यांनी याबाबत येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पसार झालेल्या पटोनियाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे यांनी खुल्या कारागृहास भेट दिली. सहायक पोलीस निरीक्षक टकले तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Life sentence prisoner escapes from yerawada jail pune print news rbk 25 zws