पुणे : महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (महामेट्रो) पुणे आणि नागपूर मेट्रो प्रकल्पांसाठी विविध अनुभवी पदांकरिता भरती जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे उमेदवारांना ४० हजारांपासून दोन लाखांपर्यंत पगार मिळणार असून इच्छुकांना १० ऑक्टोबरपर्यंत थेट टपालाद्वारे अर्ज पाठविण्यासाठीची अंतिम मुदत निश्चित केली आहे.

महा-मेट्रोने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, या नियुक्त्या पाच वर्षांच्या करारावर किंवा प्रतिनियुक्तीच्या आधारावर केल्या जाणार असून प्रामुख्याने कुशल आणि अनुभवी व्यावसायिकांना आमच्या मेट्रो प्रकल्पांच्या यशस्वी अंमलबजावणी आणि संचालनात योगदान देण्यासाठी आमंत्रित करत आहोत. संबंधित क्षेत्रातील अनुभव असलेल्या अभियंते आणि व्यवस्थापकांना मेट्रोमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे, असेही या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

महामेट्रोन मागविलेल्या अर्जांमधून नागपूर महामेट्रो प्रकल्पात उपमहाव्यवस्थापक (जमीन मुद्रीकरण), उपमहाव्यवस्थापक (ई अँड एम) आणि मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (सिग्नलिंग) या तीन पदांसाठी जागांसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे, तर पुणे प्रकल्पात उपमहाव्यवस्थापक (सुरक्षा आणि प्रशिक्षण) या पदासाठी ‘सेक्शन इंजिनीअर’ (विविध विशेषज्ञता) पदासाठी पुणे, नागपूर दोन्ही मेट्रो प्रकल्पात अनुक्रमे तीन आणि आठ जागा भरण्यात येणार आहे.

त्यासाठी इच्छुक उमेदवारांना त्यांचे अर्ज आणि संबंधित कागदपत्रे स्पीड पोस्टद्वारे पत्ता: महाव्यवस्थापक (एचआर), महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि., मेट्रो भवन, दीक्षाभूमीजवळ, नागपूर – ४४००१०, या पत्त्यावर पुण्यातील इच्छुक अर्जदारा्ंना ए२, ए३ ब्लॉक, सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्टेशन, न्यायमूर्ती रानडे पथ, शिवाजीनगर, पुणे – ४११००१ या पत्त्यांवर १० ऑक्टोबरच्या आत पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

निवड प्रक्रिया अशी होणार

  • प्रथम पात्रता
  • वैयक्तिक मुलाखत
  • कागदपत्र पडताळणी
  • वैद्यकीय तपासणी
  • पात्र उमेदवारांना उमेदवारांना ईमेलद्वारे सूचित करण्यात येईल.

पद आणि पदस्थापना

विभाग – जागा – पात्रता – पगार

१) नागपूर मेट्रो

मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (सिग्नलिंग) – एक – इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/ टेलिकम्युनिकेशन बी.ई./बी.टेक. – किमान १९ वर्षांचा अनुभव – १,२०,००० ते २,८०,००० पर्यंत

महाव्यवस्थापक (जमीन मुद्रीकरण) – एक – एमबीए (वित्त); मेट्रो प्रकल्पांसाठी मालमत्ता विकास/महसूल क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव – ७०,००० ते २,००,००० पर्यंत

उपमहाव्यवस्थापक (ई अँड एम) – एक – इलेक्ट्रिकल/मेकॅनिकलमध्ये बी.ई./बी.टेक.; ७ वर्षांचा अनुभव – ७०,००० ते २,००,००० पर्यंत

२ ) पुणे मेट्रो

उपमहाव्यवस्थापक (सुरक्षा आणि प्रशिक्षण) – एक – इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये बी.ई./बी.टेक.; ७ वर्षांचा अनुभव – ७०,००० ते २,००,०००

३) पुणे आणि नागपूर मेट्रो

सेक्शन इंजिनीअर (विविध विशेषज्ञता) – प्रत्येक विशेषज्ञतेसाठी ३ ते ८ पदे – बी.ई./बी.टेक.; ३ वर्षांचा अनुभव – ४०,००० ते १,२५,०००