लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : सासरच्या त्रासामुळे तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना वाघोली भागात घडली. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी सासू, सासऱ्यांसह सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

रियाज मुल्ला (वय २६, रा. एस. टी. कॉलनी, बाजारतळाजवळ, वाघोली) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याची आई शमीन मोहम्मद मुल्ला (वय ५४) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रियाजचे सासरे मुजीब बाबू शेख, सासू शाहीन, आजे सासरे चाँद मौला शेख, पत्नी सुफी, मेहुणी सना उस्मान शेख, मेहरुन शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी वाचा-पोलीस हवालदाराच्या मुलाकडून रिव्हाॅल्वरमधून गोळीबार, ग्रामीण पोलीस दलातील हवालदारासह मुलांविरुद्ध गुन्हा दाखल

रियाज याचा सुफी शेखशी विवाह झाला. विवाहानंतर किरकोळ कारणावरुन रियाजला अपमानास्पद वागणूक देऊन त्याला त्रास देण्यात आला. सासरकडील नातेवाईकांच्या त्रासामुळे रियाज नैराश्यात होता. नैराश्यातून त्याने राहत्या घरात गळफास घेऊन नुकतीच आत्महत्या केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक केदार तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man suicide due to father in laws troubles crime against six people pune print news rbk 25 mrj