पुणे : पुणे शहरातील सहकारनगर भागातील एका ज्योतिषाकडून तरुणीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे.या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून आरोपी अखिलेश राजगुरू (वय 45 रा.धनकवडी) याला पोलिसांनी केली अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पीडित तरुणी ही आरोपी अखिलेश राजगुरू यांच्याकडे मोठ्या भावाची पत्रिका दाखविण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी ती पत्रिका पाहून आरोपी अखिलेश राजगुरू पीडित तरुणीला म्हणाला की,तुमच्या भावा ला एक वनस्पती द्यायची आहे.ती घेण्यासाठी तुम्ही शनिवारी या असे सांगितले. त्यानंतर आरोपीने पीडित तरुणीला मेसेज करून सांगितले की, तुमची वस्तु आली आहे आणि तुम्ही ती वस्तू घेण्यास या,मी बहिणी सोबत येत असल्याचे पीडित तरुणीने सांगितले. त्यावर आरोपी म्हणाला की,तुम्ही एकट्याच या,बहिणीला आणू नका,आरोपीने सांगितल्या प्रमाणे पीडित तरुणीने केले.
आरोपी अखिलेश राजगुरू याच्या ऑफिसमध्ये पीडित तरुणी गेल्यावर वस्तू देण्याच्या बहाण्याने अखिलेश राजगुरू याने तिला किस करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली.त्यानंतर तेथून ती पीडित तरुणी बाहेर पडल्यावर आमच्याकडे आरोपी अखिलेश राजगुरू याच्या विरोधात तक्रार देताच,आम्ही आरोपीला अटक केली असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.