शिवस्वराज्य यात्रेमुळे विरोधकांची झोप उडाली

शिवस्वराज्य यात्रेचा उदंड प्रतिसाद बघून विरोधकांना झोप लागणार नाही. असा टोला खासदार अमोल कोल्हे यांनी महायुतीला लगावला आहे. लाडक्या खुर्चीसाठी महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीची आठवण होत, असल्याचा टोला देखील त्यांनी लगावला आहे. शिवस्वराज्य यात्रा भोसरी मध्ये दाखल झाल्यानंतर भव्य अशी सभा घेण्यात आली. यावेळी अमोल कोल्हे बोलत होते. कोल्हे यांनी चौफेर फटकेबाजी करत, पिंपरी- चिंचवडच्या स्थानिक राजकीय नेत्यांवर टोलेबाजी केली.

हेही वाचा >>> पिंपरी-चिंचवडमधील २६ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; तीन पीआय नियंत्रण कक्षाशी संलग्न

अमोल कोल्हे म्हणाले, शिवस्वराज्य यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. लोकसभेच्या वेळी जे वातावरण होत, त्यापेक्षा अधिक पटीने यात वाढ झाली. खोके सरकारच्या विरोधात लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. महाराष्ट्रातील भ्रष्ट महायुतीच्या सरकारला चले जाओ म्हणण्याची वेळ आली आहे. पिंपरी- चिंचवड शहरात देखील कोट्यावधींचा भ्रष्टाचार झाला. स्मार्ट सिटी, अर्बन स्ट्रीटच्या नावाखाली भ्रष्टाचार करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पालकमंत्री अजित पवार हे भ्रष्ट कारभाराची चौकशी कधी लावणार? असा सवाल देखील त्यांनी केला आहे. लाडकी बहीण ही योजना केवळ लाडक्या खुर्चीसाठी आहे. लोकसभेत महायुती सरकारच्या कानाखाली जाळ काढल्याने अशा प्रकारच्या योजना हे सरकार आणत आहे. सर्व सामान्य नागरिकांचा पैसा या योजनेतून पुन्हा परत करत आहे.

हेही वाचा >>> लोकसभेच्या निवडणुकीअगोदर आमच्याकडे कोणी बघतही नव्हते, आता…; जयंत पाटील यांची फटकेबाजी

मोशीतील कचरा डेपोतून सोन्याचा धूर?

खासदार अमोल कोल्हे यांनी चौफेर फटकेबाजी करत पिंपरी- चिंचवड मधील स्थानिक नेत्यांवर टोलेबाजी केली. मोशीत कचऱ्याचे नव्हे सोन्याचे ढीग कोणाचे आहेत?.या कचऱ्यातून कुणाचं उकळ पांढर होत आहे?. असा प्रश्न उपस्थित करत लंडनमध्ये २०० कोटींच हॉटेल कुठल्यातरी कर्तुत्वान व्यक्तीच असल्याचं म्हणत या प्रकरणाचा पत्रकारांनी शोध पत्रकारितेच्या माध्यमातून शोध लावावा अस सूचक विधान कोल्हे यांनी केलं आहे.