दारू पिताना झालेल्या वादातून मित्राचा खून; हडपसर भागातील घटना; एकास अटक

दारू पिताना झालेल्या किरकोळ भांडणावरून एकाने मित्राचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना हडपसर भागात घडली.

दारू पिताना झालेल्या वादातून मित्राचा खून; हडपसर भागातील घटना; एकास अटक
संग्रहित छायाचित्र

पुणे : दारू पिताना झालेल्या किरकोळ भांडणावरून एकाने मित्राचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना हडपसर भागात घडली. गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अनिल राजू सासी (वय ३३, रा. इंदिरानगर वसाहत) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी प्रवीण नामदेव नाईक (वय ४१, केशवनगर, मुंढवा) याला अटक करण्यात आला आहे. याबाबत अनिलचा भाऊ अक्षय राजू सासी (वय २५) याने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अनिल चर्मकार आहे. आरोपी प्रवीण मजुरी करतो. दोघे चांगले मित्र असून दोघांना दारु पिण्याचे व्यसन आहे.

आठवड्यापूर्वी हडपसर भागातील वैदुवाडीतील कालव्याजवळ दोघेजण दारू पित होते. त्या वेळी त्यांच्यात किरकोळ कारणावरुन वाद ‌झाला. रागाच्या भरात प्रवीणने अनिलच्या डोक्यात दगड घातला. गंभीर जखमी झालेल्या अनिलला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा रविवारी (७ ऑगस्ट) रात्री मृत्यू झाला. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झाला. पसार झालेल्या प्रवीणला पोलिसांनी अटक केली. सहायक निरीक्षक संतोष डांगे तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
पिस्तुल बाळगणाऱ्या गुंडाला पकडले; कात्रज भागात कारवाई
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी