पुणे : महाराष्ट्रामधून वेदांता फॉक्सकॉन ग्रुपचा प्रकल्प शिंदे-फडणवीस सरकारच्या निष्क्रियतेमुळे गुजरातमध्ये गेला. त्या घटनेच्या निषेधार्थ आज पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज बाहेर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसकडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना त्यांच्या कर्तव्याची आठवण करून देण्यासाठी विद्यार्थी वर्गाकडून “विनंती पत्रावर” स्वाक्षरी करुन घेण्यात आली तर आता बेरोजगार तरुणांवर भजी विकण्याची वेळ आली आहे ते लक्षात घेऊन यावेळी तरुणांना भजी देऊन राज्य सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. विद्यार्थ्यांना पॉपकॉर्न, गुजरातला फॉक्सकॉन, पन्नास खोके, विद्यार्थ्यांना धोके अशा घोषणा देखील यावेळी देण्यात आल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या आंदोलनाच्या नेतृत्व करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे विभागाच्या अध्यक्षा संध्या सोनावणे म्हणाल्या की, आपल्या राज्यात वेदांता फॉक्सकॉन ग्रुपचा प्रकल्प आल्यावर जवळपास २ लाख तरुणांना रोजगार मिळाला असता. मात्र सध्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या निष्क्रियतेमुळे हा प्रकल्प गुजरातमध्ये गेला आहे. या घटनेचा आम्ही निषेध व्यक्त करीत आहे.

हेही वाचा : कोयत्याने वाढदिवसाचा केक कापणे एकाला पडले महागात, रवानगी थेट तुरुंगात

तसेच त्या पुढे म्हणल्या की, केंद्रातील सरकारने लाखो तरुणांना रोजगार देऊ अशा अनेक वेळा मागील आठ वर्षात घोषणा केल्या आहेत. मात्र त्यांनी काही रोजगार उपलब्ध करून दिला नाही. पण भाजपच्या नेतृत्वाकडून सांगण्यात आले होते की,आता पकोडे तळले पाहीजे. तो देखील रोजगार असल्याच म्हटले होते आणि आज ते विधान खऱ्या अर्थाने सत्य होताना दिसत आहे. महाराष्ट्रामधून वेदांता फॉक्सकॉन ग्रुपचा प्रकल्प गुजरात मध्ये गेल्याने आपल्या तरुणांना पकोडे ऐवजी भजी विकण्याची वेळ आली आहे.म्हणून आज आम्ही तरुणांना भजी देऊन केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध नोंदवित आहोत,राज्याला पुन्हा हा प्रकल्प आणावा अशी मागणी आम्ही सरकारकडे करीत असल्याच त्यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp student protested against the state government ncp student protested against the state government svk