पुणे : दारू पिऊन शिवीगाळ केल्याने एका तरुणाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना बिबवेवाडी परिसरात घडली. श्रीकांत मच्छिंद्र जाधव (वय -३८, रा. -राजीव गांधी नगर , बिबबेवाडी, पुणे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सुनील पारेकर व त्याचे दोन साथीदार (राहणार -बिबबेवाडी ,पुणे) यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्रीकांत जाधव हा सामाजिक कार्यकर्ता असून त्यास दारूचे व्यसन होते. दारू पिऊन दोन आठवड्यापूर्वी त्याने सुनील पारेकर यांच्या घरासमोर शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे सुनील पारेकर यांनी श्रीकांत जाधव यास दारू पिऊन या ठिकाणी शिवीगाळ करू नको, असे सांगितले त्यावरून त्यांच्यामध्ये जोरदार वाद झाला होता. त्यानंतर पुन्हा बुधवारी रात्री श्रीकांत जाधव दारू पिऊन बिबेवाडीतील डॉल्फिन चौकाजवळील हर्ष टेलर दुकानासमोर थांबलेला असताना, त्याचे सुनील पारेकरशी पुन्हा वाद झाला. त्यावेळी सुनील पारेकर व त्याच्या दोन साथीदारांनी मिळून श्रीकांत जाधव यास दगडाने ठेचून बेदम मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या श्रीकांत जाधव यास पोलिसांनी भारती हॉस्पिटल याठिकाणी उपचारासाठी दाखल केले. मात्र ,गुरुवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One was killed by abuse of alcohol pune print news rbk 25 amy