पिंपरी : मृत श्वानांची विल्हेवाट लावणाऱ्या नेहरूनगर येथील दहन मशिनमध्ये (पेट इन्सिनेरेटर) बिघाड झाला आहे. त्यामुळे ७ ते १४ सप्टेंबर या कालावधीत दुरुस्ती कामानिमित्त दहन मशीन बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे श्वान मालकांची या काळात मोठी गैरसोय होणार आहे. पिंपरी पालिकेच्या पशुवैद्यकीय विभागामार्फत श्वानांच्या वैद्यकीय उपचारासोबतच मृत श्वानांची विल्हेवाट लावण्याचे काम केले जाते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : देशात चीनविषयक तज्ज्ञांची कमतरता ; माजी परराष्ट्र सचिव श्याम सरण यांची खंत

त्यासाठी नेहरूनगरला चिरंतन भूमी येथे दहन मशीन कार्यरत आहे. मात्र, या मशिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला असल्याने दुरुस्तीसाठी ७ ते १४ सप्टेंबर २०२२ या कालावधीत हे मशीन बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे श्वानमालकांची गैरसोय होणार आहे. या कालावधीत पर्यायी व्यवस्था म्हणून श्वान मालकांनी पुणे महापालिकेच्या नायडू हॉस्पिटल येथील दहन मशीनचा वापर करावा, असे आवाहन पिंपरी पालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे यांनी केले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pet incinerator closed at pimpri inconvenience to dog owners pune print news tmb 01