पिंपरी- चिंचवड शहरातील काही भागांमध्ये वाऱ्यासह गारपीट झाली आहे. सायंकाळी पाचच्या सुमारास अचानक पावसाने नागरिकांना झोडपून काढले. सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्याने वातावरणात बदल झाल्याचं पाहायला मिळालं. गारपीट झाल्यानंतर इमारतीच्या टेरेसवर काही नागरिक गारा गोळा करताना दिसले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिंपरी- चिंचवड शहरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. सायंकाळी पाचच्या सुमारास आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. अद्याप मोसमी पाऊस येण्यासाठी अवधी आहे. त्यामुळे हा अवकाळी पाऊस असल्याचं सांगण्यात येत आहे. परंतु, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ झाली, वाऱ्यासह गारपीट झाली. रस्त्यांवर आणि इमारतीच्या टेरेसवरती गारा गोळ्या करण्यासाठी नागरिक पुढे सरसावले. आज सकाळपासूनच पिंपरी- चिंचवड शहरात ढगाळ वातावरण असल्याने वातावरणात बदल जाणवत होता. तीव्र उष्णतेपासून आज पिंपरी-चिंचवडकारांची काहीशी सुटका झाल्याचे चित्र आहे. वातावरणात गारवा निर्माण झाला होता.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri chinchwad hailstorm in some areas pune kjp 91 amy