पिंपरी- चिंचवड: लाचखोर पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणीच्या घरी ५१ लाखांची रोकड एसीबीच्या पथकाने जप्त केली आहे. रविवारी प्रमोद चिंतामणी याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ४६ लाख ५० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले होते.

दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी आरोपी पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी यांनी दोन कोटींची मागणी केली होती. ही रक्कम टप्या टप्याने द्यायची अस ठरलं होतं. पहिला हप्ता हा रविवार देण्यात येणार होता. दोन कोटींपैकी ४६ लाख ५० हजार स्वीकारताना पुण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने प्रमोद चिंतामणी यांना रंगेहाथ पकडून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

सोमवारी प्रमोद चिंतामणीच्या भोसरीमधील घराची झडती घेण्यात आली. झडती दरम्यान ५१ लाखांची रोकड एसीबीच्या पथकाला मिळाली आहे. प्रमोद चिंतामणी हा मूळ कर्जुले हरियाळ ता. पारनेर, जि. अहिल्यानगर येथील आहेत. रोकडसह दागिन्यांचे आणि मालमत्तेची कागदपत्रे देखील एसीबी जप्त केली आहेत. याप्रकरणी सर्व दृष्टीकोणातून प्रमोद चिंतामणीची चौकशी करण्यात येणार आहे. दोन कोटींपैकी एक कोटी रुपये हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना देण्यात येणार होते. अस प्रमोद यांनी एसीबीच्या अधिकाऱ्यांना सांगितलं आहे. याबाबत आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची देखील चौकशी होण्याची शक्यता आहे.

२०२५ मध्ये कुणी कुणी लाच घेतली?

  • १४ एप्रिल २०२५ मध्ये पोलीस उपनिरीक्षक निलेश रमेश बोकेफाडे यांनी ४० हजारांची लाच मागितली होती.
  • १५ एप्रिल २०२५ मध्ये हिंजवडी पोलीस ठाण्यातील दत्तात्रेय काळे यांनी ६० हजारांची लाच मागितली. ३० हजार घेताना रंगेहाथ पकडले.
  • १८ जुलै २०२५ मध्ये रावेत पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पोलीस हवालदार राजश्री रवी घोडे यांनी पन्नास हजारांची लाच मागितली. ३० हजार घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले.
  • १४ ऑक्टोबर २०२५ मध्ये तळेगाव पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार सतीश अरुण जाधव पाच हजारांची लाच घेताना एसीबीने पकडले.
  • ११ ऑक्टोबर २०२५ रोजी रावेत पोलीस ठाण्यातील ज्ञानदेव तुकाराम बगाडे यांना पाच हजारांची लाच स्वीकारताना पकडले.