पिंपरी- चिंचवड : पिंपरी मार्केटमध्ये वेगवेगळ्या व्यापाऱ्यांकडून खंडणी उकळणाऱ्या दोघांना पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी शाम मेघराजानी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. गणेश गराडे आणि पंकज बगाडे अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नाव आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाम मेघराजानी यांचं पिंपरी लिंक रोडवर किराणा मालाच दुकान आहे. गणेश गराडे आणि पंकज बगाडे यांचं ये- जा असल्याने शाम यांच्याशी ओळख होती. परंतु, काही दिवसांपासून गणेश गराडे आणि पंकज बगाडे हे शाम यांना धमकावत होते. किराणा दुकानाच्या समोर पत्राशेड टाकलं होतं. ते अनधिकृत आहे. अस सांगून ५० हजारांच्या खंडणीच्या मागणी दोघांनी शाम यांच्याकडे केली. पैसे दिले नाहीत, तर जीवे मारण्याची धमकी आरोपींनी शाम मेघराजा यांना दिली.

अनधिकृत शेड असून महानगर पालिकेत तक्रार करून पाडून टाकू अस सांगण्यात आलं. अखेर ५० हजारांची खंडणी देणार नाही. अस स्पष्टपणे शाम यांनी आरोपींना सांगितलं. त्यावर गणेश गराडे याने “मी रुग्णवाहिका चालक आहे. तुम्ही रस्त्यावर कुठं दिसल्यास उडवून टाकेल.” अशी जीवे मारण्याची धमकी दिली. दोघांनी तक्रारदार यांना शिवीगाळ केली. याबाबतर इतर दुकानदारांना सांगितल्यानंतर त्यांना ही धमकावल्याच समोर आलं. अखेर या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून अटक करण्यात आली आहे.