पुणे : शाळकरी मुलीचा पाठलाग करून तिचा विनयभंग करणाऱ्या रिक्षाचालकास हडपसर पोलिसांनी अटक केली. याबाबत एका शाळकरी मुलीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी रिक्षाचालक फैजल वहाब अन्सारी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंधरा वर्षीय शाळकरी मुलगी मैत्रिणींसोबत सोमवारी (२३ सप्टेंबर) सकाळी साडेअकराच्या सुमारास हडपसर भागातील ससाणेनगर परिसरातून शाळेत निघाली होती. रिक्षाचालक फैजल अन्सारी मुलीचा पाठलाग करत होता.हा फैजलनेे त्याचा मोबाइल क्रमांक असलेली एक चिठ्ठी मुलींमोर टाकली. त्याने तिला मोबाइल क्रमांकावर संपर्क साधण्यास सांगितले.

हे ही वाचा…पुणे : फुरसुंगी, देवाची उरुळी गावांसाठी ३०० कोटी रुपये द्या, कोणी केली मागणी ?

घाबरलेल्या मुलीने या घटनेची माहिती कुटुंबीयांना दिली. त्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी तपास करुन अन्सारीला अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण अब्दागिरे तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police arrested rickshaw driver who molested school girl in hadapsar pune print news rbk 25 sud 02