प्रेमप्रकरण तुटल्यानंतर प्रेयसीला मारहाण करून तिच्या गालाचा चावा घेण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एकाविरोधात कोंढवा पोलिसांनी मारहाण तसेच विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दानीश विजय नायर (वय २२, रा.तोडकर टाऊनशिप, ससाणेनगर, हडपसर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका २१ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. नायर आणि तक्रारदार तरुणीचे प्रेमसंबंध होते. दोघांचे प्रेमसंबंध तुटल्यानंतर त्यांच्यात वाद झाला होता. चार दिवसांपूर्वी तरुणी उंड्री परिसरातून दुपारी जात होती. त्या वेळी नायरने तिला रस्त्यात अडवले आणि वाद घालण्यास सुरुवात केली. तरुणीला मारहाण करून नायरने शिवीगाळ केली. तिच्या गालाचा चावा घेऊन तो पसार झाला. घाबरलेल्या तरुणीने कोंढवा पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक चैत्राली गपाट तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police file case after after girl complaint ex boyfriend bites on cheek over break up in pune sgy