ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी आनंद दवे यांना पोलीस संरक्षण

दवे यांनी पुणे पोलिसांच्या विशेष शाखेकडे पोलीस संरक्षण मिळवण्यासाठी अर्ज केला होता.

anand dave
ब्राह्मण महासंघाचे नेते आनंद दवे (संग्रहित फोटो)

पुणे : ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी आनंद दवे यांना पुणे पोलिसांकडून संरक्षण देण्यात आले. दवे यांचे कार्यालय तसेच निवासस्थानी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

उदयपूर येथील घटनेचे पडसाद देशभरात उमटले. दवे यांच्या जीवितास धोका असल्याची माहिती केंद्रीय तपास यंत्रणांनी पोलिसांना कळविली होती. शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी दवे यांना संरक्षण देऊन काळजी घेण्याबाबतचे टि्वट केले होते. दवे यांनी पुणे पोलिसांच्या विशेष शाखेकडे पोलीस संरक्षण मिळवण्यासाठी अर्ज केला होता. त्यानंतर दवे यांचे निवासस्थान आणि कार्यालयास पोलीस संरक्षण देण्यात आले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Police protection to anand dave president of brahman mahasangh pune print news zws

Next Story
जिल्ह्यातील दैनंदिन रुग्णसंख्या एक हजारांवर ; दिवसभरात १०९१ नवे रुग्ण, एक मृत्यू
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी