लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: फळबाजारात डाळिंब, चिकू, लिंबाच्या दरात घट झाली आहे. तर कलिंगड, खरबुजच्या दरात वाढ झाली. पपई, अननस, संत्री, मोसंबी, पेरुचे दर स्थिर आहेत. उन्हाळ्यामुळे रसाळ फळांना मागणी चांगली आहे.

पुणे मार्केटयार्डात केरळ, कर्नाटक, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, औरंगाबाद आदी ठिकाणांहून फळांची आवक होते. त्यात केरळमधून सहा ट्रक अननस, संत्री १ ते २ टन, मोसंबी २० ते २५ टन, डाळिंब ३५ ते ४० टन, पपई ७ ते ८ टेम्पो, लिंबे दीड ते दोन हजार गोणी, कलिंगड ८ ते १० टेम्पो, खरबूज ५ ते ६ टेम्पो , पेरू ४०० ते ५०० प्लॅस्टिक जाळी (क्रेट्स), चिकू दोन हजार डाग अशी आवक झाली, असे फळबाजारातील व्यापाऱ्यांनी सांगितले. अवकाळी पावसाचा फळांवर काही प्रमाणात परिणाम झाल्याचेही व्यापाऱ्यांनी सांगितले.