पुणे : पावसामुळे शहरातील बहुतांश प्रमुख चौकांत खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग संथ झाला असून, कोंडी सोडविण्यासाठी शहरातील प्रमुख ३० चौक सकाळी नऊ ते रात्री दहा यावेळेत जड वाहनांना बंद करण्यात येणार आहेत. १२ ऑगस्टपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रमुख चौक जड वाहनांसाठी (डंपर, ट्रक, सिमेंट मिक्सर, तसेच अन्य जड वाहने) बंद करण्यात आले आहेत. मात्र, अत्यावश्यक सेवेतील वाहनांना या आदेशातून वगळण्यात आले आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली. शहरात गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. संततधार पावसामुळे बहुतांश रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. खड्ड्यांत पाणी साचल्यामुळे वाहतुकीचा वेग संथ झाला आहे. त्यामुळे चौकाचाैकात कोंडी होत असल्याचे दिसून आले आहे. शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रमुख ३० चौकात जड वाहनांना १२ ऑगस्टपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. सकाळी नऊ ते रात्री दहा यावेळेत जड वाहनांना मनाई करण्यात आली आहे. जड वाहनांना बंदी घालण्याचे आदेश तात्पुरते आहेत, असे पोलीस उपायुक्त पवार यांनी सांगितले.

हेही वाचा – पिंपरी- चिंचवड शहरातील पूर परिस्थिती; पार्थ पवारांनी घेतला आढावा

१२ ऑगस्टपर्यंत सकाळी नऊ ते रात्री दहा यावेळेत जड वाहनांना बंदी घालण्यात आलेले प्रमुख चौक पुढीलप्रमाणे : संचेती चौक, पौड फाटा चौक, राजाराम पूल, दांडेकर पूल चौक, नीलायम पूल (ना. सी. फडके चौकाकडे), सावरकर पुतळा चौक (बाजीराव रस्त्याकडे), लक्ष्मीनारायण चित्रपटगृह चौक (जेधे चौकाकडे), पंडोल अपार्टमेंट चौक (महात्मा गांधी रस्त्याकडे), खान्या मारुती चौक (इस्ट स्ट्रीटकडे), पाॅवर हाऊस चौक (मालधक्का चौकाकडे), आरटीओ चौक (शाहीर अमर शेख चौकाकडे), पाटील इस्टेट चौक (आरटीओ चौकाकडे), ब्रेमेन चौक (विद्यापीठ चौकाकडे), शास्त्रीनगर चौक (येरवडा गुंजन चौकाकडे), आंबेडकर चौक (सादलबाबा चौकाकडे), मुंढवा चौक (ताडीगुत्ता चौकाकडे), चंद्रमा चौक (सादलबाबा चौकाकडे), नोबल चौक (भैरोबानाला चौकाकडे), लुल्लानगर चौक (भैराेबानाला चौकाकडे), लुल्लानगर चौक (गोळीबार मैदान चौकाकडे), लुल्लानगर चौक (गंगाधाम चौकाकडे), बिबवेवाडी पुष्पमंगल चौक (जेधे चौकाकडे).

हेही वाचा – किनारपट्टी, घाटमाथ्यावर आजही पावसाचा जोर

राजस सोसायटी (बिबवेवाडी महेश सोसायटी चौकाकडे), मुंबई-पुणे रस्ता पोल्ट्री चौक (आरटीओ चैाकाकडे), उंड्री (एनआयबीएम चौकाकडे), पिसेाळी (हडपसरकडे), हांडेवाडी (हडपसरकडे), अभिमानश्री चौक, बाणेर रस्ता (विद्यापीठ चौकाकडे), अभिमानश्री चौक, पाषाण रस्ता (विद्यापीठाकडे)

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Potholes all over the city in pune due to rain heavy vehicles are banned in these 30 intersections to avoid traffic jams pune print news rbk 25 ssb