पुणे : स्वारगेट एसटी स्थानकात शिवाशाही बसमध्ये प्रवासी तरुणीवर बलात्कार करणारा आरोपी दत्तात्रय गाडेच्या मोबाइल संचाची तांत्रिक तपासणी करण्यात येत असून, पीडित तरुणी आणि गाडे हे एकमेकांच्या संपर्कात नसल्याचे तांत्रिक तपासणीत उघडकीस आले आहे. स्वारगेट एसटी स्थानकात परगावी निघालेल्या प्रवासी तरुणीकडे आरोपी दत्तात्रय गाडेने प्रवासी तरुणीकडे वाहक असल्याची बतावणी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्यानंतर आवारात थांबलेल्या एका बसमध्ये तिच्यावर गाडेने बलात्कार केला होता. पसार झालेल्या गाडेला शुक्रवारी मध्यरात्री पुणे पोलिसांनी शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून ताब्यात घेतले. गाडेला न्यायालयाने १२ मार्चपर्यंत पोलीस चौकीत ठेवण्याचे आदेश दिले. पोलिसांनी गाडेसह शिवशाही बसचा चालक, वाहक यांचे जबाब नोंदविले आहे. गाडेची ससून रुग्णालयात डीएनए चाचणी करण्यात येणार आहे. त्याच्या रक्ताचे नमुने पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. गाडे वापरत असलेला मोबाइल संच पोलिसांनी ताब्यात घेतला असून, त्याची तांत्रिक तपासणी करण्यात आली.

तांत्रिक तपासणीत गाडे आणि पीडित तरुणी एकमेकांच्या संपर्कात नसल्याचे उघडकीस आले आहे. गाडेने तरुणीला जिवे मारण्याची धमकी दिली होती. तरुणीने त्याच्याकडे गयावया केली. त्यानंतर गाडेने तिला धमकावून बसमध्ये दोनदा बलात्कार केला होता. पोलिसांनी शिवशाही बस न्यायवैद्यक प्रयोगशाळेत (फॉरेन्सिक लॅब) पाठविली असून, गाडेविरुद्ध भक्कम पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune bus rape case police technically check rape accuse dattatray gade mobile phone pune print news rbk 25 zws