पुणे : भारतीय लष्करात शिपाई असल्याचे सांगून गणवेशात फिरणाऱ्या अभिषेक शिवाजी भाेसले (वय २०, रा. पिंपळे गुरव, पुणे) या तोतयावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पाेलीस शिपाई महादेव देविदास डहाके (वय ३४) यांनी लष्कर पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

लष्कर परिसरात बिशप स्कूलसमाेर एक व्यक्ती संशयितरीत्या माेटारसायकलवरून फिरताना लष्कर पोलिसांना आढळून आली. त्याने लष्करी गणवेश परिधान केला होता. त्याच्या जवळ गणवेशातील छायाचित्र, तसेच ओळखपत्र सापडले.

त्यामुळे संबंधित व्यक्ती लष्करातील शिपाई असल्याचे भासवून सामान्य नागरिकांची दिशाभूल करताना आढळल्याने पोलिसांनी त्याच्या विराेधात लष्कर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.