पुणे : बिबवेवाडीत दहशत माजविणारा गुंड तडीपार

रेणुसे आणि साथीदारांनी बिबवेवाडीतील पापळ वस्ती परिसरात दहशत माजविली होती.

पुणे : बिबवेवाडीत दहशत माजविणारा गुंड तडीपार
( संग्रहित छायचित्र )

बिबवेवाडी भागात दहशत माजविणाऱ्या गुंडाला शहरातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी दिले. समीर दिलीप रेणुसे (वय २२, रा. पापळ वस्ती, बिबवेवाडी) असे तडीपार केलेल्या गुंडाचे नाव आहे. रेणुसे सराईत गुंड असून त्याच्या विरोधात बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे चार गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करुन रेणुसेच्या वर्तणुकीत सुधारणा होत नव्हती.

रेणुसे आणि साथीदारांनी बिबवेवाडीतील पापळ वस्ती परिसरात दहशत माजविली होती. त्यामुळे नागरिक त्याच्या विरोधात तक्रार देत नव्हते.त्याला पुणे शहर आणि जिल्ह्यातून तडीपार करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विक्रांत डिगे, राजकुमार बारबोले, दैवत शेडगे, अनिल डोळसे यांनी तयार केला. पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी त्याला शहर आणि जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचे आदेश दिले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
पुणे : व्यवसायातील भागीदारीच्या आमिषाने दहा कोटींची फसवणूक
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी