पुणे : पीएमपी बस प्रवासादरम्यान गर्दीचा फायदा घेऊन एका ज्येष्ठ महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी लांबवली. कोथरूड डेपो ते विश्रामबाग दरम्यान बुधवारी (२५ जून) रात्री पावणे दहाच्या सुमारास ही घटना घडली.
याप्रकरणी ६७ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला या मूळ सांगली येथील आहेत.
बुधवारी त्या पीएमपी बसने प्रवास करत असताना गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्या हातातील ६० हजार रुपये किमतीची सोन्याची बांगडी चोराने कापून नेली. पोलीस कर्मचारी खरात पुढील तपास करत आहेत.