पुणे : स्वारगेट भागातील गुंड कुणाला पोळ याच्या खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार विशाल उर्फ जंगल्या सातपुते याच्या खुनाच्या तयारीत असलेल्या सातजणांना लोणीकंद पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी आरोपींकडून सात पिस्तुले आणि २३ काडतुसे जप्त केली. ऐन गणेशोत्सवात सातपुतेचा खून करण्याचा कट आरोपींनी रचला होता. पाेलिसांच्या तत्परतेुमळे आरोपींचा कट उधळला गेला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शुभम ऊर्फ मॅटर अनिल जगताप (वय २७), सुमित उत्तरेश्वर जाधव (वय २६), अमित म्हस्कु अवचरे (वय २७), ओंकार ऊर्फ भैय्या अशोक जाधव (वय २४), अजय ऊर्फ सागर बाळकृष्ण हेगडे (वय २७), राज बसवराज स्वामी (वय २६), लतिकेश गौतम पोळ (वय २२) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अटक करण्यात आलेले आरोपी स्वारगेट आणि लोहियानगर भागात राहायला आहेत.

हेही वाचा : पुणे: मद्यधुंद टेम्पो चालकाने सात ते आठ वाहनांना दिली धडक, दोघे जण जखमी

सासवड येथून दहिहंडीचा कार्यक्रम संपवून घरी निघालेल्या गुंडावर हल्ला करण्यात आला होता. गुंडावर सुमीत जाधव आणि साथीदारांनी हल्ला केल्याची माहिती लोणीकंद पोलिसांना मिळाली होती. सुमीत स्वारगेट परिसरातील एन्जाॅय ग्रुपचा सदस्य आहे. शंकरशेठ रस्ता परिसरातील एका हाॅटेलमध्ये स्वारगेट भागातील गुंड कुणाल पोळ याचा पाच ‌वर्षांपूर्वी खून झाला होता. विशाल उर्फ जंगल्या सातपुतेच्या साथीदारांनी पाेळ याचा खून केला होता.

हेही वाचा : मद्यपी पतीचा चाकूने भोसकून खून; नऱ्हे भागातील घटना

खूनाचा बदला घेण्याच्या तयारीत आरोपी सुमीत जाधव आाणि साथीदार होते. याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त हिम्मत जाधव, सहायक आयुक्त प्रांजली साेनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड, सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे, संदीप तिकोणे, कैलास साळुंके, स्वप्नील जाधव, अजित फरांदे, सागर जगताप आणि पथकाने कारवाई करून आरोपींना पकडले. त्यांच्याकडून सात पिस्तुले आणि २३ काडतुसे जप्त करण्यात आली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune police ghorpade peth gangster janglya satpute murder plot foiled 7 pistol seized pune print news rbk 25 css