पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय समन्वय बैठकीला आजपासून पुण्यात सुरूवात झाली. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून बैठकीला प्रारंभ झाला. भाजप नेत्यांची उपस्थितीत बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा सुरू झाली. तीन दिवसांच्या या बैठकीत सध्याची राष्ट्रीय आणि सामाजिक परिस्थिती, शिक्षण, सेवा, आर्थिक आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा होईल. सामाजिक परिवर्तनाशी संबंधित पर्यावरण, कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, स्वदेशी आचरण तसेच नागरी कर्तव्याच्या विषयांना अधिक गती देण्यासंदर्भातही चर्चा होणार आहे. संघटनेचा विस्तार आणि विशेष उपक्रमांच्या माहितीचेआदानप्रदान करण्यात येणार असल्याची माहिती पदाधिका-यांकडून देण्यात आली. या बैठकीस ३६ संघटनांचे प्रमुख २६७ पदाधिकारी सहभागी झाले असून त्यांत ३० महिलांचा समावेश आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : पुणे लोकसभा निवडणुकीसाठी श्रीनाथ भिमाले समन्वयक

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्व सह सरकार्यवाह डॉ. कृष्णगोपाल, डॉ. मनमोहन वैद्य, अरूण कुमार, मुकुंदा आणि रामदत्त चक्रधर, अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भय्याजी जोशी, सुरेशजी सोनी, व्ही. भागैय्याजी, राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का जी, प्रमुख कार्यवाहिका अन्नदानम सीताक्का, ‘महिला समन्वय’ च्या वतीने चन्दा, ‘स्त्री शक्ती’च्या अध्यक्षा शैलजा, राष्ट्रीय सेवा भारतीच्या महामंत्री रेणू पाठक, वनवासी कल्याण आश्रमाचे अध्यक्ष रामचंद्र खराड़ी, विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष राजशरण शाही, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश नड्डा, भारतीय किसान संघाचे संघटन मंत्री दिनेश कुलकर्णी, ‘विद्या भारती’चे अध्यक्ष रामकृष्ण राव, पूर्व सैनिक सेवा परिषदेचे अध्यक्ष लेफ्टनंट जनरल विष्णुकान्त चतुर्वेदी (निवृत्त), भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष हिरण्मय पंड्या, ‘संस्कृत भारती’चे संघटन मंत्री दिनेश कामत यांचा समावेश आहे.

हेही वाचा : सातासमुद्रापार स्पेन येथील बेले गंधारा आणि इटली येथील अ‍ॅना मारा या तरुणींना मर्दानी खेळाची भुरळ

तीन दिवसांच्या या बैठकीत सध्याची राष्ट्रीय आणि सामाजिक परिस्थिती, शिक्षण, सेवा, आर्थिक आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा होईल. सामाजिक परिवर्तनाशी संबंधित पर्यावरण, कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, स्वदेशी आचरण तसेच नागरी कर्तव्याच्या विषयांना अधिक गती देण्यासंदर्भातही चर्चा होईल. संघटनेचा विस्तार आणि विशेष उपक्रमांच्या माहितीचेही आदानप्रदान करण्यात येईल.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune rss coordination committee meeeting in the presence of bjp leaders various topics discussed pune print news apk 13 css