पुणे : वेगवेगळ्या गुन्ह्यात दोन सावकारांना बेड्या ; खंडणी विरोधी पथकाची कामगिरी 

झहीर जुल्फीकार सय्यद (वय ४४ रा. माळवाडी, हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

पुणे : वेगवेगळ्या गुन्ह्यात दोन सावकारांना बेड्या ; खंडणी विरोधी पथकाची कामगिरी 
( संग्रहित छायचित्र )

बेकायदेशीर सावकारी करीत साडेसहा लाखांचे तब्बल ११ लाख ५० हजार वसूल करूनही आणखी पावणेदोन लाख रूपये मागणाऱ्या सावकाराला खंडणी विरोधी पथक दोनने अटक केली. त्याशिवाय साडेचार लाखांचे ८ लाख ४८ हजार वसूल करीत आणखी साडेतीन लाख रूपये मागणाऱ्याला आणखी एका सावकाराला बेड्या घातल्यामुळे खळबळ उडाली आहे. 

झहीर जुल्फीकार सय्यद (वय ४४ रा. माळवाडी, हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तक्रारदाराने  अडचणीत असल्यामुळे  झहीरकडून पाच लाख रूपये व्याजाने घेतले होते. त्याबदल्यात झहीर प्रत्येक महिन्याला ४० हजारांची वसूल  करीत होता. ऑगस्ट २०२० ते ऑगस्ट २०२२ कालावधीत दोन वर्षांत आरोपीने त्यांच्याकडून तब्बल १० लाख ४८ हजार वसूल केले.  

दुसऱ्या गुन्ह्यात साडेसहा लाखांच्या बदल्यात तब्बल ११ लाख ५० हजार रूपये वसूल करूनही आणखी पावणेदोन लाखांची मागणी करणाऱ्या सावकाराला अटक केली. कासिब कादीर कुरेशी (वय ३३  रा. गाडीतळ, हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तक्रारदाराने कासिबकडून डिसेंबर २०२० मध्ये साडेसहा लाख रूपये व्याजाने घेतले होते. आरोपीने फेब्रुवारी २०२२ पर्यंत त्यांच्याकडून ११ लाख ५० हजार रूपये वसूल केले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pune two moneylenders arrested in different crimes pune print news amy

Next Story
रूग्णवाहिका चालकांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे ; पिंपरीतील युवतींचा उपक्रम
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी