Pune University exams on 30th January now on 5th February pune print news ccp 14 ssb 93 | Loksatta

पुणे विद्यापीठाच्या ३० जानेवारीच्या परीक्षा आता ५ फेब्रुवारीला

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ३० जानेवारीला होणाऱ्या परीक्षा ५ फेब्रुवारीला घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Pune University exams postponed
पुणेविद्यापीठ, महाविद्यालयीन शिक्षतेकर कर्मचाऱ्यांचे सोमवारपासून कामबंद आंदोलन (संग्रहित छायाचित्र)

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतदानामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ३० जानेवारीला होणाऱ्या परीक्षा ५ फेब्रुवारीला घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पुणे, अहमदनगर आणि नाशिक या तिन्ही जिल्ह्यांसाठी लागू असेल.

हेही वाचा – अखेरचा श्वास पुण्यातच घेता यावा, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांची भावना

हेही वाचा – पुणे : ओशो आश्रमातून चंदनाची झाडे चोरीला

विद्यापीठाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सर्व विद्याशाखांच्या सर्व अभ्यासक्रमांची हिवाळी सत्राची परीक्षा सध्या सुरू आहे. मात्र नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील काही महाविद्यालये मतदान केंद्र म्हणून जाहीर केली आहेत. त्यामुळे ३० जानेवारीला होणाऱ्या सर्व विद्याशाखांच्या सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा ५ फेब्रुवारीला घेण्यात येतील. या संदर्भातील परिपत्रक विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने संकेस्थळावर प्रसिद्ध केले आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-01-2023 at 21:35 IST
Next Story
अखेरचा श्वास पुण्यातच घेता यावा, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांची भावना