पुणे प्रतिनिधी: काँग्रेस पक्षाचे नेते निलंबित खासदार राहुल गांधी हे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल केलेल्या विधानामुळे चर्चेत आहे. त्याच दरम्यान राहुल गांधी यांची खासदारकी देखील रद्द झाली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षातील नेते मंडळी भाजपच्या नेत्यावर विरोधात आक्रमक झाल्याचे पाहण्यास मिळत आहे.त्या सर्व घडामोडी घडत असताना राहुल गांधी यांच्या विधानामुळे दुसरा गोडसे निर्माण होऊ नये.असा इशारा पुण्यातील हिंदू महासंघाचे आनंद दवे यांनी राहुल दिला आहे. तर राहुल गांधी यांनी अंदमान येथील जेलमध्ये राहून दाखवावे. त्यासाठी तिकीट देखील राहुल गांधी यांना त्यांनी पाठवले आहे. आता यावर एकूणच राहुल गांधी किंवा काँग्रेस मधील नेते काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे जरुरीचे ठरणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यावेळी आनंद दवे म्हणाले की,प्रत्येक राजकीय पक्षाची आदर्श स्थान आणि आदर्श व्यक्ती वेगळी असू शकतात. हे हिंदू महासंघाला मान्य आहे.पण मागील काही महिन्यापासून हिंदुत्वाच दैवत असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल बदनामीच धोरण राहुल गांधी सतत करित आहेत. तसेच आम्ही महात्मा गांधी यांच्याबद्दल आदर ठेवून, आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकर आणि महात्मा गांधी यांच तुलनात्मक पुस्तक देखील प्रसिद्ध केल आहे. त्यामुळे आता आम्ही राहुल गांधी यांना एक आव्हान केल आहे. अंदमान जेलमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर हे अकरा वर्ष राहिले असून त्याच जेलमध्ये एक दिवस तरी राहुल गांधी यांनी राहून दाखवावे. त्या पार्श्वभूमीवर आम्ही अंदमान येथील तिकीट राहुल गांधी यांना पाठवली आहेत. त्यामध्ये जाण्याचा आणि येण्याचा असा एकूण खर्च आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी त्या ठिकाणी राहून दाखवाव अस आमच आव्हान असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

आणखी वाचा- ठाकरे सरकार पाडण्यासाठी दोन वर्षात घेतल्या दीडशे बैठका; आरोग्यमंत्री तानाजी सावंतांचा गौप्यस्फोट

तसेच ते पुढे म्हणाले की, यापुढील काळात देखील राहुल गांधी यांना लक्ष करण्याचा प्रयत्न केला. तर महात्मा गांधीची सर्व पाप अगदी ब्रम्हचार्‍याच्या प्रयोगापासून, देशाच्या फाळणीपर्यंत यासह अनेक घटनांबाबत महात्मा गांधी यांना उघड करण्याची इच्छा नाही. पण आम्हाला उघड कराव लागेल. त्यामुळे राहुल गांधी यांच्या विधानामुळे दुसरा गोडसे निर्माण होऊ नये. अशी भूमिका मांडत एक प्रकारे राहुल गांधी यांना त्यांनी इशारा दिला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhis statement should not create another godse says anand dave svk 88 mrj