पुणे : विवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार करुन वैद्यकीय उपचाराच्या बहाण्याने पाच लाख रुपये उकळण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपन अनंत थत्ते (वय ३७, रा. कोथरुड) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत एका तरुणीने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

थत्ते याने तरुणीला विवाहाचे आमिष दाखविले होते. विवाहाच्या आमिषाने त्याने तरुणीवर कोथरुड भागातील एका सदनिकेत बलात्कार केला. त्यानंतर थत्ते याने आईच्या उपचारांसाठी तातडीने पैशांची गरज असल्याची बतावणी तरुणीकडे केली. तरुणीकडून पाच लाख रुपये त्याने उकळले. तरुणीने त्याच्याकडे पैशांची मागणी केली. तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याने तरुणीला शिवीगाळ करुन धमकावले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पाटील तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rape young woman lure of marriage five lakh rupees medical treatment pune print news rbk 25 ysh