पुणे :पुणे लोकसभा मतदार संघाच उद्या मतदान होणार असून या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार माजी महापौर मुरलीधर मोहोळ,महाविकास आघाडीचे उमेदवार विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर,वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे, एमआयएमकडून माजी नगरसेवक अनिस सुंडके हे चार उमेदवार आहेत. या मतदानाला काही तास शिल्लक राहिले आहेत.

मात्र त्यापूर्वी सहकारनगर भागात भाजपचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन पैशांचे वाटप करीत आहेत.त्या भाजप कार्यकर्त्यांवर पोलीस आणि निवडणुक आयोगाचे अधिकार्‍यांनी कारवाई करावी, या मागणीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर हे सहकारनगर पोलिस स्टेशनमध्ये मागील दोन तासापासून ठिय्या आंदोलनास बसले आहेत.तर भाजप आणि काँग्रेस पक्षाचे पोलिस स्टेशन बाहेर कार्यकर्ते आमनेसामने आले असून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे.आहेत.यामुळे सहकारनगर भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले की, पैशांच वाटप करणाऱ्या कार्यकर्त्यांवर पोलीस गुन्हे दाखल करित नाही.तोवर पोलीस स्टेशनमधून बाहेर पडणार नसल्याची भूमिका मांडली.रवींद्र धंगेकर यांनी ठिय्या आंदोलन मागे घ्यावे,यासाठी पोलिस अधिकारी त्यांच्याशी चर्चा करीत आहे.मात्र रवींद्र धंगेकर त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ravindra dhangekar has been protesting for two hours in sahakarnagar police station in pune svk 88 amy
First published on: 13-05-2024 at 00:46 IST